
दैनिक स्थैर्य । दि. २१ नोव्हेंबर २०२२ । फलटण । फलटण तालुक्यातील मठाचीवाडी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ , राहुरी मान्यता प्राप्त फलटण एज्युकेशन सोसायटीचे श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय,फलटण यांचे आगमन झाले आहे. त्यांचा समस्त ग्रामस्थ व सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्यातर्फे यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी मठाचीवाडी गावचे सरपंच मा. काशिनाथ गेजगे , उपसरपंच मा. रुपाली भांडवलकर, तलाठी मा. सोमनाथ पंडित , ग्राम सेवक मा. एस.ए.एखंडे, कृषी सहाय्यक मा. दिपक बोडके ,माजी कृषी सहाय्यक मा.खाशाबा जाधव यांचेसह गावातील असंख्य ग्रामस्थ यावेळी ऊपस्थित होते.
श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे मा.प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर ,कार्यक्रम अधिकारी प्रा. ए.डी. पाटील व प्रा. जे.व्ही. लेंभे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यानदुत स्वराज पवार, अभिषेक काटे, अथर्व सोनवणे, संकेत कावरे ,सुमित भवारी, अविनाश येडे , ऋषिकेश गायकवाड यांनी मठाचीवाडी येथील शेतकऱ्यांचे अनुभव जाणून घेतले व ग्रामीण उद्यान कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत हे उद्यानदूत येथील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
या अडीच महिन्यांच्या कालावधीत उद्यानदुत शेतातील माती परीक्षण ,फळबाग लागवड, एकात्मिक कीड रोग व्यवस्थापन, बीज प्रक्रिया , शेतातील अवजारांचा वापर, शेतीचे आर्थिक नियोजनाबाबत गावकरी व शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. विविध विषयांसाठी प्रात्यक्षिकांचे आयोजन करून आधुनिक शेतीविषयी जनजागृती करणार आहेत असे उद्यानदुतानी यावेळी सांगितले.