
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि.२७ जानेवारी २०२२ । फलटण । फलटण येथील श्री सद्गुरू शिक्षण संकुलात प्रजासत्ताक दिन संस्थेचे अध्यक्ष तुषार गांधी, उपाध्यक्ष राजाराम फणसे, सचिव सौ. मधुबाला भोसले यांच्या प्रमुख उपस्थिती मध्य उत्साहात साजरा करण्यात आला.
एन. एम. एम. एस. व शिष्यवृत्ती परीक्षा मध्ये निवड झाल्याबद्दल सुजल प्रकाश जगताप विद्यार्थ्याचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच लायन्स क्लब ऑफ फलटणच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या इंटरनॅशनल पिस पोस्ट स्पर्धेमध्ये यशस्वी झालेले सारंग ठोंबरे, पुष्कर बोरावके, अनुष्का घनवट ,वीरेंद्र जाधव व तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेली वैष्णवी कुचेकर या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.
