‘आरंभ है प्रचंड’ पुस्तकाच्या दुसर्‍या आवृत्तीचे खा. शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. २१ जून २०२४ | बारामती |
संपूर्ण महाराष्ट्रभर गाजलेल्या व विक्रमी प्रतींची विक्री झालेल्या लेखक सचिन गोसावी लिखित ‘आरंभ है प्रचंड’ या प्रेरणादायी व व्यक्तिमत्त्व विकासविषयक पुस्तकाच्या दुसर्‍या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा खा. शरद पवार यांच्या हस्ते बारामती (गोविंदबाग) येथे पार पडला.
या प्रकाशन सोहळ्यासाठी कराड-पाटण शिक्षक बँकेचे संचालक प्रविण मोरे सर, युवा उद्योजक बाबुराव भोसले सर, साहित्यिक अ‍ॅडव्होकेट आकाश आढाव सर तसेच इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.

समाजपरिवर्तन व समाजप्रबोधनाच्या उद्देशाने लिहिलेले हे प्रेरणादायी पुस्तक तरुणांसोबतच समाजातील प्रत्येक घटकास एक दिशादर्शक आहे. तसेच वैफल्य व नैराश्य दूर करून आयुष्याचा एक नवा मार्ग दाखवणार्‍या या पुस्तकाला मिळत असलेला प्रतिसाद पाहता अल्पावधीतच हे पुस्तक महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेले असेल, असा मला विश्वास वाटतो. लेखक सचिन गोसावी यांनी समाज परिवर्तनासाठी केलेले निर्भीड लेखन ही निश्चितच अभिनंदनीय बाब आहे.त्यांची व त्यांच्या पुस्तकाची पुढील वाटचाल निश्चितच यशस्वी असेल, असे मत या पुस्तक प्रकाशनावेळी खा. शरद पवार यांनी व्यक्त केले.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!