राऊत यांची पत्रकार परिषद म्हणजे, खोदा पहाड निकला चूहा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि.१६ फेब्रुवारी २०२१ । मुंबई । गेले काही दिवस फार मोठे काही तरी प्रकरण बाहेर काढणार असे वातावरण निर्माण करून शिवसेना खा. संजय राऊत यांची पत्रकार परिषद झाली पण खोदा पहाड निकला चूहा असे झाले. असे नुसते आरोप करण्याने काही होत नाही. पुरावे असतील तर तपासी यंत्रणांना द्या आणि त्यांनी काम केले नाही तर न्यायालयात जा. असल्या पोकळ धमक्यांना कोणी घाबरत नाही, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी मंगळवारी केले.

संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेविषयी एका पत्रकाराने प्रतिक्रिया विचारली असता मा. चंद्रकांतदादा पाटील बोलत होते. ते म्हणाले की, या पत्रकार परिषदेसाठी खूप वातावरणनिर्मिती केली, पण गर्जेल तो पडेल काय, असे झाले. एखादा माणूस अडचणीत आला की, थयथयाट करतो, तसा प्रकार संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेत दिसला.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!