रणजीत सुर्यवंशी यांचा प्रोफेशनल मेकअपआर्टिस्ट म्हणून सन्मान

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

 

स्थैर्य, वावरहिरे, (अनिल अवघडे) : आरडी स्टुडिओ यांच्या माध्यमातून आणि प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आणि डिझायनर सुहास दादा गौते यांच्या प्रयत्नातून घेण्यात आलेल्या सात दिवशीय प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट वर्कशॉपमध्ये शेवटच्या दिवशी घेण्यात आलेल्या परीक्षेच्या माध्यमातून रणजीत सुर्यवंशी यांना प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट म्हणून घोषित करण्यात आले.

यावेळी मेकअप मी अकॅडमी यांच्यामार्फत सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन त्यांचा उचित गौरव करण्यात आला. यावेळी प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आणि डिझायनर सुहास गौते, डायरेक्टर संतोष कापसे, तसेच मल्हारी पवार यांची प्रमुख उपस्थितीसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!