
दैनिक स्थैर्य | दि. १४ नोव्हेंबर २०२१ | फलटण | आळंदी – पंढरपूर या श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी महामार्गावर वारकर्यांच्या सोयीसाठी मुक्कामांच्या ठिकाणी प्राथमिक आणि अत्यावश्यक सुविधा उभारण्यात याव्यात, अशी मागणी माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केंद्रीय रस्ते व वाहतूक परिवहन मंत्री ना.नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.
यामध्ये प्रामुख्याने माऊलींच्या पालखी सोहळ्याचे पहिले उभे रिंगण पार पडणार्या चांबोदाचा लिंब येथे रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात यावी. तरडगाव हद्दीमध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूला दोन मजली सार्वजनिक स्वच्छतागृह व स्नानगृहाची उभारणी करावी, अशी मागणी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली आहे.