श्रीमंत रामराजे आज हिंगणगाव गटात!; तालुक्याचे लक्ष

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. 15 सप्टेंबर 2024 | फलटण | विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते आज हिंगणगाव जिल्हा परिषद गटामध्ये विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला आहे. हिंगणगाव जिल्हा परिषद गटामध्ये आळजापूर व झणझणे सासवड या ठिकाणी जाहीर सभांचे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे. आळजापूर व झणझणे सासवड येथे श्रीमंत रामराजे नक्की काय बोलणार? याकडे तालुक्याचे लक्ष लागुन राहिले आहे.

आळजापुर येथे आज दुपारी 4 वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे श्रीमंत रामराजे यांच्या जाहीर सभेचे आयोजन राजे गटाच्या वतीने करण्यात आले आहे.

झणझणे सासवड येथे आज सायंकाळी 5 वाजता श्रीमंत रामराजे यांच्या जाहीर सभेचे आयोजन हे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य धैर्यशील उर्फ दत्ता अनपट यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!