रमेशचंद्र शेंडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. 03 ऑक्टोबर 2024 | फलटण | येथील कै.अनंतराव शेंडे फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, नवदूर्ग गणेशोत्सव मंडळाचे संस्थापक तथा फलटण तालुका गुरव समाज संघटनेचे संस्थापक रमेशचंद्र शेंडे यांचा 72 वा वाढदिवस उत्साहात संपन्न झाला.

वाढदिवसानिमित्त रमेशचंद्र शेंडे यांना फलटण – कोरेगांव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ, श्री सद्गुरु व महाराजा उद्योग समूहाचे संस्थापक दिलीपसिंह भोसले, तिरकवाडीच्या जयभवानी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आनंदराव शितोळे, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक महादेवराव माने, माजी नगरसेविका सौ.प्रगतीताई कापसे, माजी नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सतिश सस्ते, नवदूर्ग गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष पोपटराव बर्गे, डॉ.सुहास म्हेत्रे, हनुमंत शिरनामे, बबलु शिरनामे, अमोल रणवरे, शंकरराव संकपाळ (ठाणे), शंकरराव मुळीक, सिमला टेलरचे शेख बंधू आदींसह विविध क्षेत्रातील संस्था, संघटनांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, मित्रपरिवार, नातेवाईक मंडळींनी शुभेच्छा दिल्या.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!