दैनिक स्थैर्य | दि. २१ जून २०२३ | फलटण |
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे फलटण नगरीमध्ये आगमन झाले. त्यानिमित्ताने सालाबाद प्रमाणे यावर्षीही राजमाता अहिल्यादेवी गणेश उत्सव मंडळ अहिल्यानगर फलटण या मंडळाच्या वतीने अन्नदान आणि नेत्र तपासणी शिबिर आयोजित केले होते.
या मंडळाचे संस्थापक श्री. संदीप चोरमले यांनी या सर्व कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या उत्सव सोहळ्यासाठी वारकर्यांनी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी करून महाप्रसादाचा तसेच नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घेतला. या कार्यक्रमाची सुरुवात माऊलींच्या प्रतिमेचे पूजन मंडळाचे जेष्ठ मार्गदर्शक मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते आणि महिला वर्ग यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. त्याचबरोबर नेत्र तपासणी शिबीर नेत्ररोग तज्ञ डॉ. साक्षी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सौ. लता मोरे आणि श्री. रविंद्र बाबर, सौ. प्रीती भोजने यांनी पार पाडले.
हा सोहळा यशस्वी होण्यासाठी मंडळाचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, समस्त चोरमले आणि मित्र परिवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे मंडळाचे संस्थापक श्री. संदीप चोरमले यांनी सांगितले.