
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. ६ नोव्हेंबर २०२३ | फलटण |
फलटण तालुक्यातील सासकल ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत राजेंद्र घोरपडे विजयी झाले आहेत.
फलटण तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी काल, रविवारी मतदान झाले होते. त्यापैकी सासकल येथे चुरशीने ८३.६५ टक्के मतदान झाले होते. आज, सोमवारी सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरूवात झाली. थोड्या वेळातच मतमोजणी पार पडून सासकल ग्रामपंचायतींच्या सदस्यपदाच्या पोटनिवडणुकीत राजेंद्र घोरपडे विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकार्यांनी जाहीर केले.
