राजेंद्र धुमाळ यांचे निधन


स्थैर्य, फलटण, दि. ३१ : जिल्हा परिषद शाळा कचरेवाडा (ता.फलटण) येथील शिक्षक, गोखळी गावचे सुपुत्र तथा महादेवमाळ (फलटण) येथील रहिवासी राजेंद्र भिकोबा धुमाळ (वय 46 वर्षे) यांचे अल्पशा आजाराने पुणे येथे उपचारा दरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. 

राजेंद्र धुमाळ हे अत्यंत मनमिळावू, सामाजिक उपक्रमात पदरमोड करुन सढळ हाताने मदत करणारे होते. त्यांच्या निधनाने गोखळी ग्रामस्थांसह, सहकारी शिक्षक, मित्रपरिवारातून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्यावर आज (दि.30 रोजी) पुणे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!