📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. २७ नोव्हेंबर २०२४ | फलटण | फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्ष, राजे गटाच्या पदाधिकारी, कार्यकर्ता मेळावा हा शुक्रवार दि. २९ नोव्हेंबर रोजी कोळकी येथील अनंत मंगल कार्यालय येथे आयोजित करणार आला असून या संवाद मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या मेळाव्यासाठी माजी आमदार दीपक चव्हाण, फलटण बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
