
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
स्थैर्य, अलिबाग, दि. १८: तोक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचे तातडीने संयुक्त पंचनामे सुरू करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने सर्व तहसिलदारांना दिले आहेत.
दि.17 मे 2021 रोजी जिल्हयात तोक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या घर, गोठे, शेती व सार्वजनिक मालमत्ता यांचे झालेल्या नुकसानीचे संयुक्त पंचनामे करण्याची कार्यवाही तात्काळ पूर्ण करावी.
तसेच मृत व्यक्ती, मृत जनावरे यांच्याबाबतही संयुक्त पंचनामे करण्याची कार्यवाही त्वरित पूर्ण करून त्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास त्वरित सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सर्व तहसिलदारांना दिले आहेत.
