खटकेवस्तीवर जुगार अड्ड्यावर छापा; ७७ हजार २८० रुपयांचा मुद्देमाल जप्त

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य | दि. १० नोव्हेंबर २०२१ | फलटण | फलटण तालुक्यातील खटकेवस्ती गावाच्या हद्दीमध्ये वड्याचा माळ नावाच्या शिवारात उसाच्या शेताजवळ आंबाच्या झाडाखाली पाया शंकर निंबाळकर, रा. डोरलेवाडी (ता. बारामती), महादेव रामभाऊ खटके, रा. खटकेवस्ती, गणेश नारायण खटके रा. खटकेवस्ती, नितीन बापूराव कदम रा. गवळीनगर, अशोक वामन घाडगे रा. घाडगेमळा, सुनील खटके, अमोशा वाघमोडे, अजित मिंड, रामभाऊ वाघमोडे, गोरख पवार, लखन शेख, अजित गावडे हे सर्व जण तीन पानी पत्त्यावर पैसे लावून जुगार खेळात होते. त्यांच्या कब्जात असलेले ७७ हजार २८० रुपयांचे जुगाराचे साहित्य त्यामध्ये रोख रक्कम, मोबाईल, टेबल, खुर्च्या, पत्त्यांची पाने असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. याबाबत फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अरगडे करीत आहेत.

Back to top button
Don`t copy text!