स्थैर्य, सातारा, दि.७: मोळाचा ओढा ते आझाद रस्त्यावरील एका जुगार अड्डयावर शाहूपुरी पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत दहाजणांवर गुन्हा दाखल केला असून 34 हजार रोख व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.
याबाबत माहिती अशी, मोळाचा ओढा ते आझाद रस्त्यावरील एका मैदानाजवळील पत्र्याचे शेड आहे. या शेडच्या आडोशाला जुगाराचा अड्डा सुरू होता. याची खबर मिळताच शाहूपुरी पोलिसांनी त्याठिकाणी छापा टाकून 34 हजार 716 रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त केला. याप्रकरणी किरण रविंद्र तपासे वय 26 रा. गुरुवार पेठ, सातारा, सागर शामराव चव्हाण वय 32 रा. तामजाईनगर, सातारा, नितीन अनिल कुर्हाडे वय 34 एकता कॉलनी, करंजे पेठ, सातारा, गोरक्षनाथ विनायक जाधव, वय 32 रा. सैदापूर, ता. सातारा, धनाजी शंकर वाघमारे वय 52 एकता कॉलनी करंजे, सातारा, अनिल लक्ष्मण वाघमारे वय 37 गुरुवार पेठ सातारा, फिरोज खुदबुद्दीन झारी वय 56 रा. तामजाईनगर सातारा, मुंकंदर सिराज मुलाणी वय 36 रा. कोंडवे मज्जिदशेजारी, ता. सातारा, सुनील नानू जाधव वय 51 रा. दिव्यनगरी, ता. सातारा आणि इब्राहिम यासीन शेख वय 36 रा. कोंडवे, ता. सातारा यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.