दैनिक स्थैर्य । दि.०७ फेब्रुवारी २०२२ । फलटण । भाडळी ता.फलटण येथे शनिवार दिनांक 5 रोजी सर्जेराव दादा माने यांच्या मालकीच्या इमारतीमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्डयावर फलटण ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून 4 लाख 37 हजार 940 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत ग्रामीण पोलीस स्टेशन ला दिलेली माहिती अशी की, दि 5 फेब्रुवारी रोजी तिनपानी पत्त्याचा जुगार पैजेवर पैसे लावून त्याचे आर्थिक फायद्याकरीता 1) सुनील मोतीराम पवार वय 40 वर्ष राहणार बुधवारपेठ फलटण 2) जमन तारो पंडित वय 32 वर्ष राहणार येरवडा सादलबाबा दर्गा जवळ पुणे 3) योगेश यशवंत खरात वय 34 वर्ष राहणार पंणदरे तालुका बारामती जिल्हा पुणे 4) आतिश सुभाष साळवे वय 24 वर्षे राहणार पंणदरे तालुका बारामती जिल्हा पुणे 5) सोमनाथ सिताराम घनवट वय 39 वर्ष राहणार जाधववाडी तालुका फलटण 6) जांन्टी रा. पंणदरे ता.बारामती 7) माऊली भिवरकर रा. फलटण 8) सनी काकडे रा. फलटण 9) सर्जेराव दादा माने राहणार भाडळी तालुका फलटण हे खेळत असताना एकूण 4,37,940 रुपये किमतीचे जुगाराचे साहित्यासह मिळून आले. सदर आरोपी नं.1 यांचेकडे मो.सा.चे कागदपत्र व चालविण्याचा परवाना नसताना , सर्व आरोपीनी कोरोना साथीच्या अनुषंगाने मानवी जीवितास धोका निर्माण होईल हे माहीत असताना देखील सदर ठिकाणी मास्कचा वापर न करता covid-19 विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव पसरून व्यक्तिगत व सामाजिक सुरक्षा धोक्यात घालून कोविड साथीचे गंभीर आजाराचा प्रसार पसरू नये म्हणून आदेशाचे पालन न करता निष्काळजीपणा करताना मिळून आले असल्याचची फिर्याद गणेश महादेव अवघडे यांनी दिली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक आरगडे करत आहेत.