दैनिक स्थैर्य | दि. १ सप्टेंबर २०२३ | फलटण |
आसू (ता. फलटण) गावच्या हद्दीत दौलत पवार यांचे पत्र्याच्या शेडचे पाठीमागे उघड्यावर विकास दौलत पवार (वय २७, रा. आसू) हा जुगार खेळताना आढळून आला. त्याच्यावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून रोख १ हजार ९१५ रूपये व जुगाराचे साहित्य व इतर वस्तू पोलिसांनी त्याच्याकडून जप्त केल्या आहेत. या प्रकरणी अधिक तपास पोलीस हवालदार साबळे करत आहेत.