
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. १ सप्टेंबर २०२३ | फलटण |
आसू (ता. फलटण) गावच्या हद्दीत शांतीलाल भानुदास पवार यांच्या घराच्या आडोशाला उघड्यावर शरद पोपट पवार (वय ४०, रा. आसू, ता. फलटण) हा जुगार खेळताना आढळून आला. त्याच्यावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून रोख २ हजार ५ रूपये व जुगाराचे साहित्य व इतर वस्तू पोलिसांनी त्याच्याकडून जप्त केल्या आहेत.
