
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. २५ जून २०२४ | फलटण |
दारूबंदी कायद्यांतर्गत गिरवी (ता. फलटण) गावच्या हद्दीत सोमवार, दि. २४ जून २०२४ रोजी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास फलटण ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून अवैधरित्या घराच्या आडोशाला चोरटी दारू विक्री करणार्यावर कारवाई करून देशी दारूचा ७००/- रुपये किमतीचा प्रोबेशनचा माल जप्त केला.
या प्रकरणी पोलिसांनी निलेश दत्तात्रय वाघ (वय ३२, राहणार गिरवी, तालुका फलटण) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
अधिक तपास स.पो.फौ. ऐके करत आहेत.
