
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
स्थैर्य, सातारा, दि.15 : सातारा शहरातील राजवाडा टॉवर्सच्या पार्किंगमध्ये जिजामाता पतसंस्थेच्या जिन्याच्या आडोशाला सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर शाहूपुरी पोलिसांनी छापा टाकला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला असून अविनाश बबन तुपे (रा. चिपळूणकर बागेच्या मागे, 446, मंगळवार पेठ, सातारा) आणि चंदू चोरगे (रा. रविवार पेठ, सातारा) अशी त्यांची नावे आहेत. याप्रकरणी अविनाश तुपे याला सीआरपीसी 41 (1) (अ) प्रमाणे नोटीस बजावण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी 725 रुपयांची रोकड आणि जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.
