
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. २५ डिसेंबर २०२१ । सातारा । सातारा तालुक्यातील आरळे येथे असणाऱ्या बस स्टॉपजवळ संभाजी वाघमारे यांच्या जनावराच्या गोठ्याच्या आडोशाला सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर सातारा तालुका पोलिसांनी छापा मारला. या कारवाईत पोलिसांनी ४ हजार १0२ रुपयांची रोकड आणि जुगाराचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी नितीन बजरंग करे (रा. वाढे, ता. सातारा) याच्यावर गुन्हा दाखल झाला असून त्याला प्रतिबंधात्मक नोटीस बजावण्यात आली आहे. अधिक तपास सातारा तालुका पोलीस करत आहेत.
