
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. २५ जून २०२४ | फलटण |
सुरवडी तालुका फलटण गावचे हद्दीत सोमवारी सायंकाळी फलटण ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून बेकायदेशीर हातभट्टीची सुमारे दारू विक्री करताना व पिताना चौघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ९५० रुपये किमतीचा माल जप्त केला.
या प्रकरणी मनिषा प्रशांत कर्मवत, सुरेखा सौरभ राठोड, मल्हारी मधुकर भिसे, सुनील रामचंद्र गायकवाड (सर्व राहणार सुरवडी, तालुका फलटण) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी अधिक तपास पो.हवा. पिसे करत आहेत.
