राहुल गांधींनी मनाचा मोठेपणा दाखवावा अन् OBC समाजाची माफी मागावी – कपिल पाटील


दैनिक स्थैर्य । दि. ३१ मार्च २०२३ । भिवंडी । देशाला जागतिक पातळीवर एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करीत असतानाच राहुल गांधी यांनी समस्त ओबीसी समाजाची बदनामी करण्याचे काम केले आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी देशातील ओबीसी समाजाची माफी मागितलीच पाहिजे अशी भूमिका केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी रविवारी आपल्या दिवे अंजुर येथील निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली आहे.

कपिल पाटील म्हणाले की, या देशात तब्बल ५२टक्के समाज ओबीसी समाज आहे, त्यांच्या वक्तव्याने ओबीसी समाजाच्या भावना दुखावण्याचा काम राहुल गांधी यांनी केला आहे आणि म्हणूनच देशातील ओबीसी समाजामध्ये गांधी यांच्याविरोधात प्रचंड प्रमाणावर रोष निर्माण झाला आहे. भारतीय जनता पक्ष सोबतच समस्त ओबीसी समाज आंदोलनाच्या माध्यमातून राहुल गांधी यांच्या निषेध नोंदवीत आहे.एवढे करूनही राहुल गांधी यांनी माफी मागणार नाही अशी जी भूमिका घेतलेली आहे ती अत्यंत मग्रुरी पणाची आहे अशी देखील मंत्री पाटील यांनी यावेळी केली.

तसेच देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देशांमध्ये नाही तर जगामध्ये ही स्वतःची प्रतिमा निर्माण केलेली आहे. त्यामुळे मोदींना बदनाम करण्याचा डाव सगळ्या विरोधी पक्षाने सुरू केलेला आहे, पण या देशातील जनता सुज्ञ असून देशाच्या जनतेला माहित आहे की त्यांच्या नेतृत्वामध्ये या देशांमध्ये नऊ वर्षांमध्ये एकाही मंत्र्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही. आणि सामान्य नागरिकांनाही हा मुद्दा मान्य होत नाही की मोदीजींच्या कार्यकाळात भ्रष्टाचार होईल अशा प्रकारची शंका कोणाच्याही मनामध्ये तसुभरही शंका येत नाही. त्यामुळे मोदीजींच्या नेतृत्वावर देशाचा पूर्ण विश्वास आहे असंही कपिल पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, मोदी अदानी यांच्या संबंधाबाबत विचारले असता मोदींचा आणि अदानींचा काही संबंध या गोष्टी येत नाही. त्याच्यामुळे ही नागरिकांची दिशाभूल करण्याचा यांचा प्रयत्न आहे त्याच्यापासून जनता निश्चितपणाने सावध आहे. जनतेला माहित आहे की देशाला पुढे कोण नेऊ शकतो, मागच्या नऊ वर्षात जे विकासाचं काम झालेलं आहे ते आपल्या नजरेसमोर आहे. देश प्रगतीपथावर आहे. आता जगामध्ये मंदी असताना भारत देश मंदीपासून सावरलेला आहे याचे एकमेव कारण काय असेल या देशाला लाभलेले मोदींचे नेतृत्व अशा शब्दात मंत्री पाटील यांनी मोदींचे कौतुक करत राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध या पत्रकार परिषदेत केला.


Back to top button
Don`t copy text!