
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

दैनिक स्थैर्य | दि. १७ नोव्हेंबर २०२४ | फलटण | सहकारमहर्षी स्व. हणमंतराव पवार यांच्या पत्नी श्रीमती पुष्पाताई हणमंतराव पवार व त्यांच्या कन्या सौ. पल्लवी पाटील यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार सचिन सुधाकर पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या घड्याळ या चिन्हावर मतदान करत सचिन सुधाकर पाटील यांना निवडून आणण्याचे आवाहन सुद्धा त्यांनी केले आहे.
