कडक लॉकडाऊन झालेनंतर पुसेगाव पोलिसांची कारवाई 19 मोटार सायकल जप्त


स्थैर्य, पुसेगाव, दि. ०५ : मा.जिल्हाधिकारी यांनी सातारा जिल्ह्यात कडक लॉकडाऊन जाहीर केलेनंतर पुसेगाव येथे नाकाबंदी करून विनाकारण फिरणारे 19 लोकांच्या मोटार सायकल जप्त करून पोलीस ठाणेत लावणेत आलेल्या आहेत. तसेच विनामास्क फिरणारे 6 लोकांच्यावर कारवाई करणेत आली आहे व पुसेगाव येथील एका किराणा दुकानावर लाॕकडाऊन आदेशाचा वारंवार भंग केले बाबत पुसेगाव तलाठी,पुसेगांव ग्रामपंचायत ,व पुसेगाव पोलिस स्टेशन यांनी संयुक्त कारवाई केली व दुकान दारावर 1000 रुपये दंड व 10/5/2021पर्यत दुकान सिल केले आहे.सदर कारवाई मध्ये सपोनि.चेतन मछले, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब लोंढे, व पोलीस अंमलदार यांनी सहभाग घेतला.


Back to top button
Don`t copy text!