श्रीमती वासंती महामुलकर यांना ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राज्यस्तरीय पुरस्कार’ जाहीर

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य | दि. ६ मार्च २०२३ | फलटण |
राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागातर्फे दिला जाणारा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राज्यस्तरीय पुरस्कार २०१४-१५’ हा फलटण शहरातील श्रीमती वासंती महामुलकर यांना जाहीर झाला आहे. या पुरस्कारासाठी निवड झाल्याचे पत्र श्रीमती महामुलकर यांना प्राप्त झाले असून जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय सातारा यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

जागतिक महिला दिनाचे (दि. ८ मार्च रोजी) औचित्य साधून गेट वे ऑफ इंडिया, मुंबई या ठिकाणी सायंकाळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून श्रीमती वासंती महामुलकर यांना वरील पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

Back to top button
Don`t copy text!