
दैनिक स्थैर्य । दि. २५ ऑगस्ट २०२२ । मुंबई । चुकीच्या बदली आदेशाबाबत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना समज देण्यात आली आहे, असे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले.
सदस्य राम सातपुते, मंगेश चव्हाण यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, चुकीच्या बदली आदेशाबाबत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना समज देण्यात आली आहे. त्यांनी संबंधित महिला पोलीस कर्मचारी यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केली आहे. संबंधित आदेशाचे काम करणाऱ्या लिपिकावर ठपका ठेवण्यात आला आहे.