पालखी मार्गाच्या चौपदरीकरणाचा मार्ग मोकळा; पुणे, सातारा अन् सोलापूरचा प्रवास होणार सुसाट

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांतून जाणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असून प्रवासाचा वेळ वाचणार आहे.

स्थैर्य, सातारा, दि. १२ ऑक्टोबर : आषाढी वारीदरम्यान लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम आता वेगाने पूर्णत्वाकडे जात आहे. पुणे, सातारा आणि सोलापूर या तीन महत्त्वाच्या जिल्ह्यांना जोडणाऱ्या या पालखी महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे भाविकांची वारी अधिक सुरक्षित होणार असून, तीनही जिल्ह्यांतील सर्वसामान्य प्रवाशांचा वेळ व इंधनाची मोठी बचत होणार आहे.

तीन जिल्ह्यांतील दळणवळणाला नवी गती

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) माध्यमातून राबवण्यात येत असलेल्या या प्रकल्पांतर्गत हडपसर, सासवड, जेजुरी, वाठार, फलटण ते पंढरपूर या मार्गांचे रुंदीकरण करण्यात येत आहे. महामार्गावर दोन्ही बाजूंनी चार पदरी सिमेंट काँक्रीटचे रस्ते उभारण्यासोबतच वारकऱ्यांच्या पायी प्रवासासाठी रस्त्याच्या बाजूला स्वतंत्र व सुरक्षित ‘पालखी मार्ग’ तयार करण्यात आला आहे. यामुळे भविष्यातील आषाढी वारीत वारकऱ्यांना वाहतूक कोंडीचा किंवा अपघाताचा सामना करावा लागणार नाही.

स्थानिक अर्थव्यवस्था अन् वाहतुकीला दिलासा

पालखी मार्गाचे रुंदीकरण आणि उड्डाणपुलांचे काम पूर्ण झाल्याने पुणे, सातारा आणि सोलापूरमधील औद्योगिक, कृषी आणि धार्मिक पर्यटनाला मोठा हातभार लागणार आहे. विशेषतः फलटण, माण आणि खटाव यांसारख्या दुष्काळप्रवण भागातील शेतमालाची बाजारपेठेतील वाहतूक जलद गतीने होण्यास मदत होणार आहे. या मार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या संपुष्टात येणार असल्याने प्रवासी व वाहनधारकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

 

 

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!