रस्ता वाहतूक सुरक्षा अभियान २०२५ निमित्त फलटणमध्ये जनजागृती रॅली

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. २८ जानेवारी २०२५ | फलटण |
मुधोजी हायस्कूल, फलटणचे एनसीसी व इतर विद्यार्थी यांच्या समवेत अपघात मुक्त फलटण यासाठी दिनांक २७ जानेवारी २०२५ रोजी दुपारी प्रभारी पोलीस निरीक्षक फलटण शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य चौकातून रॅली काढण्यात आली.

या रॅलीमध्ये फलटण नगरपालिकेचे अधिकारी तेजस पाटील व महात, पोलीस निरीक्षक गुन्हे यशवंत नलावडे, महिला पोलीस उपनिरीक्षक गाजरे, पोलीस हवालदार किरण जाधव, पोलीस अंमलदार परिहार, ट्रॅफिक वॉर्डन, सर्व नेमणूक फलटण शहर पोलीस ठाणे हे सहभागी झालेले होते.

फलटण शहरातील नागरिकांना वाहतुकीचे नियम पाळणे, वाहन चालविताना मोबाईल न वापरणे, पादचार्‍यांना प्राधान्य देणे व अपघात झाल्यास जखमींना मदत करून ताबडतोब पोलिसांना संपर्क करणे याबाबत मार्गदर्शन व आवाहन करण्यात आले.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!