फलटण शहरातील घंटागाडीवर ‘ऑडिओ क्लिप’द्वारे मतदानाबाबत जनजागृती होणार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ४ एप्रिल २०२४ | फलटण |
४३ माढा लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अनुषंगाने २५५ फलटण (अ.जा.) विधानसभा मतदार संघामध्ये सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले तसेच तहसीलदार फलटण डॉ. अभिजित जाधव व स्वीप नोडल ऑफिसर एस. के. कुंभार यांच्या मार्गदर्शनखाली मतदारांमध्ये मतदान जनजागृतीचे काम सुरू आहे.

फलटण शहरातील मतदानाचा टक्का वाढण्यासाठी शहरातील कचरा घंटागाडीवर भारत निवडणूक आयोगामार्फत बनवण्यात आलेल्या ‘ऑडिओ क्लिप’द्वारे मतदारांमध्ये मतदान जनजागृतीबाबत अनोखा उपक्रम सुरू करण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार फलटण शहरात उद्या, दि. ४ एप्रिल २०२४ पासून ‘ऑडिओ क्लिप’द्वारे जनजागृती करण्यात येणार आहे.

श्री. तेजस पाटील, उपमुख्याधिकारी नगर परिषद फलटण, स्वीप पथक प्रमुख शहाजी शिंदे तसेच सचिन जाधव स्वीप सहायक अधिकारी व स्वीप टीम कक्ष यांच्या वतीने आयोजन केले आहे. यामुळे मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृती होऊन मतदानाचा टक्का वाढण्यास मदत होणार आहे.


Back to top button
Don`t copy text!