
थेट WhatsApp वर मिळवा
कुटुंबातील वडिलोपार्जित घर किंवा जमीन कायदेशीर वारसाहक्काने स्वतःच्या नावावर करण्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते आणि कोणती प्रक्रिया पार पाडावी लागते, याबाबतची महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
स्थैर्य, सातारा, दि. १६ ऑक्टोबर : मालमत्तेच्या मालकी हक्कावरून अनेकदा कौटुंबिक वाद किंवा तांत्रिक अडचणी निर्माण होतात. विशेषतः वडिलोपार्जित संपत्ती किंवा घर कायदेशीर वारसाहक्काने स्वतःच्या नावावर हस्तांतरित करण्यासाठी महसुली नियमांची आणि कायदेशीर प्रक्रियेची माहिती असणे अत्यंत आवश्यक असते. मालमत्तेची विक्री करताना किंवा कर्ज घेताना कागदपत्रांची पूर्तता करणे सोपे जावे यासाठी वारसनोंद प्रक्रिया महत्त्वाची ठरते.
आवश्यक कागदपत्रे आणि कायदेशीर प्रक्रिया
मालमत्ता नावावर करण्यासाठी मागील नोंदणीकृत मालकाचे मृत्यू प्रमाणपत्र, कायदेशीर वारसाचा दाखला किंवा वारीसनोंद अर्ज, ७/१२ उतारा किंवा मालमत्तेची संबंधित कागदपत्रे असणे अनिवार्य आहे. मूळ मालकाने मृत्यूपत्र तयार केले असल्यास त्यानुसार किंवा कायदेशीर वारसाहक्क कायद्यानुसार फेरफार (Mutation) अर्ज सादर करावा लागतो. स्थानिक तहसील कार्यालय किंवा महानगरपालिकेकडे अर्ज केल्यानंतर कागदपत्रांची पडताळणी करून योग्य त्या कायदेशीर प्रक्रियेद्वारे संबधित वारसांच्या नावे मालमत्तेची नोंद केली जाते.





