फलटण नगर परिषदेतील स्वच्छता कर्मचार्‍यांची राज्यसेवा गट ‘क’ पदावर पदोन्नती

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. 23 ऑगस्ट 2024 | फलटण | महाराष्ट्र शासनाच्या नगरपरिषद प्रशासन संचालनालयाकडून सध्या राज्यातील नगरपरिषद, नगरपंचायतीमधील स्वच्छता निरीक्षक या नियमित पदावर कार्यरत व स्वच्छता निरीक्षक पदाव्यतिरिक्त इतर नियमित पदावर कार्यरत कर्मचार्‍यांना राज्यसेवा स्वच्छता निरीक्षक संवर्गातील गट- क, श्रेेणी-क पदावर पदस्थापना देण्याबाबत आदेश जारी केले आहेत. या कर्मचार्‍यांना पदस्थापना दिलेल्या ठिकाणी तात्काळ रुजू व्हावे लागणार आहे.

फलटण नगर परिषदेतील पदस्थापना मिळालेल्या कर्मचार्‍यांची नावे व पदस्थापना दिलेल्या ठिकाण पुढीलप्रमाणे :

  1. विनोद अशोक जाधव – खंडाळा, जि. सातारा
  2. विलास पांडुरंग टेंबरे – वडूज, जि. सातारा
  3. मुष्ताक अहमद अब्दुल लतीफ महात – दहिवडी, जि. सातारा
  4. शुभांगी प्रल्हाद गायकवाड – लोणंद, जि. सातारा
  5. विजय रमेश मारुडा – वाई, जि. सातारा
  6. स्वरूप संजय अहिवळे – मेढा, जि. सातारा
  7. मुकेश विनायक अहिवळे – कराड, जि. सातारा
  8. राकेश दत्तात्रय गलियल – सातारा, जि. सातारा
  9. गणेश रामदास काकडे – सातारा, जि. सातारा

Back to top button
Don`t copy text!