प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पी.ओ.पी.) मूर्ती बनविणे व विक्री करण्यास मनाई


दैनिक स्थैर्य । दि. २१ मार्च २०२३ । सातारा । पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, दिल्ली यांनी दि.12/05/2020 रोजी पारीत केलेली मार्गदर्शकतत्त्वांनुसार कोणत्याही विषारी, अजैविक कच्चा माल (जसे की , पारंपारिक चिकणमाती आणि माती तसेच प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी), प्लास्टिक आणि थर्माकोल (पॉलीस्टीरिन) विरहित नैसर्गिक, जैव-विघटनशील, पर्यावरणास अनुकूल असलेल्या कच्च्या मालापासून बनवलेल्या मूर्तींना प्रोत्साहन/अनुमती देण्यात यावी व प्लास्टर ऑफ पॅरिस (PoP) च्या मूर्तींवर बंदी घालण्यात यावी असे सूचविण्यात आलेले आहे. तसेच ही मार्गदर्शक तत्त्वे धार्मिक उत्सव साजरे करताना नैसर्गिक जलस्रोतांच्या गुणवत्तेवर व पर्यावरणावर कोणताही परिणाम न होता पर्यावरणपूरक मूर्तीचे विसर्जन सुनिश्चित करण्यासाठी तयार करण्यात आलेले आहेत. तसेच या बाबत मा.मुबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेले रिटपिटीशन नं.3146/2021 देखील दाखल झालेले आहे ही बाब न्याय प्रविष्ठ आहे.

सदस्यसचिव, म.प्र.नि.मंडळ, मुंबई यांचेकडून सदर्भियपत्र क्र.4 अन्वये सर्व जिल्हाधिकारी व नगरपालिका/नगरपंचायत यांना पत्रान्व येपी.ओ.पी. (प्लास्टर ऑफ पॅरिस) च्या मूर्ती बनविणे व विक्री करणेस प्रतिबंध करणेबाबत कळविण्‍यात आलेले आहे. तसेच या कार्यालयाने देखील दि.27/01/2022 रोजीच्या पत्रान्वये उपमुख्यकार्यकारी अधिकारी (ग्रा.प), जि.प.सातारा व जिल्हा नगर प्रशासन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय सातारा यांनाकळ विलेलेआहे.

जिल्हाधिकारी सातारा यांचे कडील दि.24/06/2022 रोजीच्या आदेशान्वये पी.ओ.पी (प्लास्टर ऑफ पॅरिस) च्या मूर्तीबनविणे व विक्री करणेस प्रतिबंध करण्यात आलेले आहे.

जिल्हाधिकारी सातारा यांनी दि.09/07/2022 रोजीच्या अदेशान्वये दि.24/06/2022 रोजीच्या आदेशामध्ये अंशता बदल करुन 31 ऑगस्ट 2022 पर्यंत सातारा जिल्हयातील कुंभार समाजाकडे विक्रीसाठी तयार असणाऱ्या पी.ओ.पी. च्या मूर्ती वितरण/विक्री करणेस मुभा देण्यात आलेली होती. परंतु तदनंतर म्हणजेच दिनांक 01/09/2022 पासून सातारा जिल्हयामध्ये पी.ओ.पी (प्लास्टर ऑफ पॅरिस) च्या सर्व प्रकारच्या मूर्ती बनविणे, आयात करणे, वितरण करणे, खरेदी व विक्री करणेस प्रतिबंध केलेला आहे.

तसेच सदर आदेशान्वे पी.ओ.पी (प्लास्टर ऑफ पॅरिस) च्या मूर्ती बनविणे व विक्री करणेस प्रतिबंध करण्यात आलेने या कार्यालयाकडून मुख्याधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्था व मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.सातारा यांना सदर आदेशाची कडेकोट अंमलबजावणी करणेबाबत कळविण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!