प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजची १२ वीच्या १०० % निकालाची परंपरा कायम


दैनिक स्थैर्य | दि. २२ मे २०२४ | फलटण |
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ, पुणे यांनी फेब्रुवारी/मार्च – २०२४ मध्ये घेतलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत कोळकी प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमधील इयत्ता बारावी वाणिज्य शाखेच्या (इंग्रजी माध्यम) विद्यार्थ्यांनी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे.

यामध्ये कु. पूजा कुदळे ८९.५०% गुण, कु. फरहत आतार ८६.३३%, कु. सोहा आतार ८४.८३%, कु. अनुष्का साळुंखे ७८.६७%, कु. जयेश दोषी ७६.८३%, कु. अंश गांधी ७०.५०%, कु. शाहिद शेख ६५%, कु. प्रांजली येवले ६४%, वैष्णवी जगदाळे ६०% या विद्यार्थ्यांनी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे.

या विद्यार्थ्यांना श्रीमती योगिता सस्ते, श्री. निखिल कापले, सौ. प्रज्ञा देशमुख, सौ. पूजा साठे या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

या उज्ज्वल यशाबद्दल सरस्वती शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रदीप माने, सचिव श्री. विशाल पवार, व्यवस्थापकीय संचालिका सौ. संध्या गायकवाड, कोषाध्यक्षा सौ. सविता माने, संचालिका सौ. प्रियांका पवार व प्राचार्य श्री. अमित सस्ते, पर्यवेक्षिका सौ. माधुरी माने, समन्वयिका सौ. सुवर्णा निकम व योगिता सस्ते तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


Back to top button
Don`t copy text!