‘प्रोग्रेसिव्ह’ कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजची दहावी व बारावीच्या 100 टक्के निकालाची परंपरा कायम

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य । 15 मे 2025। कोळकी । येथील सरस्वती शिक्षण संस्था संचलित प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजने इयत्ता दहावी व इयत्ता बारावी शंभर टक्के निकालाची उज्वल परंपरा कायम ठेवली आहे. प्रशालेचे इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेसाठी एकुण 26 विद्यार्थी बसले होते. यामध्ये विशेष प्राविण्यमध्ये एकूण 17, प्रथम श्रेणीत 08, व द्वितीय श्रेणीत 01 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

समरा आरिफ तांबोळी 94.40% , केशव तुषार महानवर 94%, अनुष्का प्रशांत हेळकर 93.20% , ओम वैभव कर्णे 92.40% गुण, मानसी मयुर नलवडे 92.40%, समर्थ रमेश नाळे 91.80%, स्वराजंली संतोष डांबे 90.80% गुण मिळविले. तसेच मराठी माध्यमातून आलेली मुले इ.12 वी इंग्रजी वाणिज्य मध्ये चांगल्या गुणांनी पास झाली. यामध्य सारा ईतिक्फ शेख 81.33%, प्रथमेश सुनिल शिंदे 73%, चंदन रायप्पा आंबिपी 67%, ओमकार सर्जेराव ठणके 61%, सौद समीर शेख 59.33% गुण मिळवून यश संपादित केलेे.

बारावीच्या विद्यार्थ्यांना सौ. प्रज्ञा देशमुख, निखिल कापले, ज्ञानेश्वर जाधव, सौ.पुजा साठे यांनी तर इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना अमित सस्ते, महेंद्र कातुरे, ज्ञानेश्वर जाधव, सौ.सुजाता गायकवाड, सौ.स्नेहल भोसले, श्रीमती आशाताई भराडे या शिक्षकांनी मार्गदर्शन केले.
या 100 टक्के निकालाची परंपरा कायम राखल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रदीप भीमराव माने, संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका सौ.संध्या गायकवाड, कोषाध्यक्षा सौ.सविता माने, प्राचार्य अमित सस्ते, पर्यवेक्षक महेंद्र कातुरे, समन्वयिका सौ.सुजाता गायकवाड, सौ.माधुरी माने, सौ.अहिल्या कवितके, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे अभिनंदन केले.

तसेच इ.11 वी इंग्रजी माध्यमाच्या वाणिज्य शाखेसाठी शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार ऑनलाईन प्रणालीद्वारे प्रवेश दिले जाणार आहेत. तरी इच्छुक विद्यार्थी आणि पालक यांनी प्रवेशा संबंधित अधिक माहितीसाठी कॉलेजशी त्वरित संपर्क साधावा, असे संस्थेच्यावतीने आवाहन करण्यात येत आहे.

Back to top button
Don`t copy text!