
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि.११ जानेवारी २०२२ । फलटण । महाराष्ट्र राज्य परिषद पुणे यांच्या वतीने ऑगस्ट -२०२१ मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत इ. आठवी सरस्वती शिक्षण संस्था, संचलित प्रोग्रेसिव्ह कॉन्वेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या कु.संतोषी लक्ष्मण शिंदे हिने २१४ गुणांसह जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत ४४ वा क्रमांक व कु. दिग्विजय अनिल घोरपडे यांने २१४ गुणांसह जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत ४६ वा क्रमांक प्राप्त करून उज्ज्वल यश संपादित केले. यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेचे शिक्षक श्रीमती. आशादेवी भराडे, श्री.मंगेश देशपांडे श्री.ज्ञानेश्वर जाधव व श्री. सारिका लाळगे यांनी मार्गदर्शन केले.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष प्रदीप माने, सचिव श्री. विशाल पवार, व्यवस्थापकीय संचालिका सौ.संध्या गायकवाड,संचालिका सौ.प्रियंका पवार, यांचेसह मुख्याध्यापिका सुमन मकवाना, समन्वयिका सौ.माधुरी काटकर, व सौ.आहिल्या कवितके पर्यवेक्षक अमित सस्ते, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कोळकी व गुणावरे शाखा यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
