
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य | दि. २१ एप्रिल २०२३ | फलटण |
स्वराज्य निर्माते श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती परंपरेप्रमाणे शनिवार, २२ एप्रिल २०२३ रोजी रात्री ठीक ११.०० वाजता संपन्न होत आहे. या शिवजयंतीनिमित्त सुप्रसिद्ध शिवव्याख्याते प्रा. नितीन बानगुडे-पाटील यांचे ‘शिवचरित्रा’वर जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन फलटण तालुका शिवजयंती उत्सव व मोती चौक शिवजयंती महोत्सव मंडळ, फलटण यांनी केले आहे. हे व्याख्यान मोती चौक, श्रीमंत रामराजे शॉपिंग सेंटर, फलटण येथे होणार असून हा कार्यक्रम शुक्रवार, दि. २१ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी ठीक ७.०० वाजता सुरू होणार आहे.
या व्याख्यानाचा लाभ फलटण तालुक्यातील तमाम जनतेने घ्यावा, असे आवाहन फलटण तालुका शिवजयंती उत्सव व मोती चौक शिवजयंती महोत्सव मंडळ यांनी केले आहे.





