दैनिक स्थैर्य | दि. १८ सप्टेंबर २०२३ | फलटण |
जैन धर्मीयांची दक्षिण काशी असलेल्या फलटण नगरीत जैन समाजाचे प्रथमाचार्य श्री १०८ शांतिसागर महाराजांच्या ६८ व्या पुण्यतीथीनिमित्त आदीनाथ मंदीर येथून भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती.
शोभायात्रेत पालखी व आचार्य शांतिसागर महाराजांचा चित्ररथ ठेवण्यात आला होता. प.पू. अपूर्वसागर महाराज व प. पू. अर्पितसागर महाराज यांच्याबरोबरच फलटणमधील बहुसंख्य श्रावक-श्राविका, महिला मंडळाच्या सदस्या, युवक वर्ग शोभायात्रेत उपस्थित होता. शोभायात्रेत चक्रवर्ती ढोलताशा पथकाने सर्वाचे लक्ष वेधून घेत आपली कला सादर केली.
श्री चंद्रप्रभू मंदिर येथे महाराजांच्या सान्निध्यात भगवंताचा अभिषेक संपन्न झाला. शोभायात्रा श्री आदिनाथ मंदिरपासून सुरू होऊन शुक्रवार पेठ, शंकर मार्केट, श्रीराम मंदिर, गजानन चौक, मारवाड पेठ, बारस्कर गल्ली या मार्गाने जाऊन श्री आदिनाथ मंदिर येथे विसर्जित करण्यात आली.