‘राज्याला आपला अभिमान’, डिसले गुरुजींच्या पाठीवर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांकडून कौतुकाची थाप

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

स्थैर्य, मुंबई, दि.४ : सोलापूर जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक
रणजितसिंह डिसले यांना युनेस्को व लंडनच्या वार्की फाउंडेशनतर्फे
संयुक्तपणे दिला जाणारा ‘ग्लोबल टीचर पुरस्कार’ जाहीर झाल्याबद्दल
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डिसले गुरुजींच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. महाराष्ट्राला आपला अभिमान आहे, अशा भावना
मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या. (CM Uddhav Thackeray And
DCM Ajit Pawar Appriciate Ranjitsinh Disale from solapur honoured by the
global award)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डिसले गुरुजींना फोन करुन त्यांनी घेतलेल्या भरारीबद्दर त्यांचं कौतुक केलं.
यावेळी डिसले गुरुजींनी ग्रामीण भागात शिक्षणाविषयी आवड
निर्माण करण्यासाठी ते करीत असलेल्या उपक्रमांची मुख्यमंत्र्यांना माहिती
दिली तसेच तंत्रज्ञानाचा कसा उपयोग करतो ते सांगितलं.

डिसले गुरुजींचं मार्गदर्शन घेणार- मुख्यमंत्री

पुरस्काराची
मिळालेली 7 कोटी रुपयाची रक्कम इतर देशातील शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी
तसेच टीचर इनोव्हेशन फंडसाठी आपण वापरणार असल्याचे गुरुजींनी सांगितल्यावर
मुख्यमंत्र्यांनी शिक्षणासाठी दाखवलेल्या त्यांच्या समर्पणाची प्रशंसा
केली. राज्यातील ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा सुधारणे तसंच मुलांमध्ये
शिक्षणाची आवड जोपासण्यासाठी निश्चितपणे गुरुजींचं मार्गदर्शन घेतले जाईल,
असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही
डिसले गुरुजींचं कौतुक केलं. डिसले गुरुजींना जाहीर झालेला पुरस्कार
ग्रामीण भागातील शिक्षकांचा गौरव वाढवणारा तसंच ग्रामीण भागातील शिक्षण
चळवळीला बळ देणारा ठरेल, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.

डिसले गुरुजी राज्याचा आणि देशाचा गौरव- अजित पवार

डिसले
गुरुजींनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी आवड निर्माण
करण्यासाठी मनापासून प्रयत्न केले. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला.
उपक्रमशील शिक्षक म्हणून त्यांनी केलेले कार्य देशातीलच नव्हे तर, जगभरातील
शिक्षकांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. ‘क्यूआर कोड’च्या माध्यमातून त्यांनी
घडवून आणलेल्या शैक्षणिक क्रांतीची दखल घेऊन 140 देशांतील 12 हजार
शिक्षकांतून त्यांची या मानाच्या पुरस्कारासाठी झालेली निवड राज्याचा व
देशाचा गौरव आहे, असं अजित पवार म्हणाले.

पुरस्कार स्वरूपात मिळणारी
7 कोटी रुपयांची रक्कम इतर देशातील शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी तसेच ‘टीचर
इनोव्हेशन फंड’साठी वापरण्याचा त्यांचा निर्धार त्यांचे वेगळेपण सिद्ध
करणारा आहे. भारताला गुरुशिष्य परंपरेचा गौरवशाली इतिहास आहे. डिसले यांनी
ही परंपरा केवळ पुढे नेली नाही तर, या परंपरेचा गौरव वाढवण्याचं काम केलं
आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी डिसले गुरुजींचा गौरव केला.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!