सातारा जिल्हा एकल प्रा. शिक्षक सेवा मंचची सहविचार सभा संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

सभेत मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष विकास खांडेकर खाली बसलेले जिल्हा व तालुकास्तरीय पदाधिकारी


फलटण दि. ४ : सातारा जिल्हा एकल प्रा. शिक्षक सेवा मंचची सहविचार सभा नुकतीच शिक्षक भवन, सातारा येथे संपन्न झाली, या सभेत एकल सभासद नोंदणी तालुकास्तरावर प्राधान्याने पूर्ण करणे, तालुका व जिल्हा स्तरावर एकल सेवा मंच देणगी ५०० व १००० रुपये जमा करणे. आगामी शिक्षक बँक निवडणूकीत पॅनल टाकणे, शिक्षक बँकेचे व्याजदर कमी करणे, बँकेत अनावश्यक नोकरभरती करु नये अशी मागणी करण्यात आली, वैद्यकीय बिले वेळेत मिळावीत, वरीष्ठ श्रेणी प्रस्ताव मंजूर करणे, Dcps पावत्याचा हिशोब संबंधीताना मिळावा, सेवा पुस्तक अद्ययावत करणे, शिक्षक बदलीत एकल शिक्षकांना न्याय मिळावा इत्यादी विषयावर तालुकानिहाय चर्चा करण्यात आली.

सातारा जिल्हा एकल प्रा. शिक्षक सेवा मंचच्या या सहविचार सभेस राज्य उपाध्यक्ष दंडिले यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाध्यक्ष विकास खांडेकर यांचे उपस्थितीत संपन्न झाली.

प्रारंभी तालुकाध्यक्ष नंदकुमार कदम यांनी उपस्थितांचे स्वागत केले, जिल्हा कार्याध्यक्ष हनुमंत सकलावे यांनी प्रास्ताविकात सहविचार सभेचा उद्देश स्पष्ट केला. सभेत तालुकानिहाय विषय घेण्यात आले. 

यावेळी एकल प्रा.शिक्षक सेवा मंच राज्य उपाध्यक्ष दंडिले जिल्हाध्यक्ष विकास खांडेकर, जिल्हा कार्याध्यक्ष सकलावे, जिल्हा सरचिटणीस चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष जाधव, महिला जिल्हाध्यक्षा सौ. मनिषा महाडिक, सातारा तालुका सरचिटणीस सौ.पंडित इत्यादींनी सभेला मार्गदर्शन केले. या सभेला जिल्हा संपर्क प्रमुख राजेश पाटोळे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख तात्याबा भोसले, राहुल नेवसे, सरचिटणीस फलटण दत्ताजी शिंदे, कार्याध्यक्ष खटाव विजय गुरव, जेष्ठ सल्लागार खटाव राजाराम खाडे, प्रसिध्दी प्रमुख खटाव जितेंद्र ढमाळ, कार्याध्यक्ष सातारा सौ.दिपाली पंडित, सरचिटणीस सातारा सौ. माधवी ढवळे, उपाध्यक्ष सातारा किशोर शेलार, हेमंत राऊत, सातारा, जिल्हा मार्गदर्शक तात्यासाहेब धनवडे, जिल्हा संघटक विक्रम शेंडगे, सरचिटणीस सातारा अतुल कुलकर्णी इत्यादी पदाधिकारी व सदस्य सभेला उपस्थित होते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!