दैनिक स्थैर्य | दि. 03 डिसेंबर 2023 | फलटण | फलटण येथे प्रादेशिक परिवहन कार्यालय म्हणजेच स्वतंत्र आरटीओ कार्यालय सुरू व्हावे; यासाठी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली; त्यावर मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी फलटण आरटीओ कार्यालयाचा प्रस्ताव विशेष बाब म्हणून तातडीने सादर करावा असे आदेश परिवहन विभागाच्या सचिवांना दिले आहेत.
सध्या फलटण येथे आरटीओ कार्यालय नाही; त्यामुळे फलटण येथून सातारा येथे जाण्यासाठी सुमारे 60 ते 90 किलोमीटरचा प्रवास सर्वसामान्य नागरिकांना करावा लागत आहे. यासाठी फलटण येथे आरटीओ कार्यालय सुरू होणे; अत्यंत गरजेचे आहे. याबाबतचे पत्र माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर केले त्यावर मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी विशेष बाब म्हणून सदर प्रस्ताव तातडीने सादर करावा; असे आदेश परिवहन विभागाच्या सचिवांना दिले आहेत.