स्थैर्य, पणजी, दि.२३ : पर्यटन हा गोव्यातील
प्रमुख उद्योगापैंकी एक आहे. कोरोनाच्या महामारीमुळे हा व्यवसाय पूर्णपणे
ठप्प झाला होता. आता राज्य सरकारच्या पाठिंब्यामुळे गोव्यातील पर्यटन
नव्याने उभारी घेण्यास सज्ज झाले आहे. पर्यटकांकडूनही प्रतिसाद मिळत आहे.
देशातील पर्यटक सध्या मोठ्या प्रमाणात सर्वत्र दिसत आहेत.
कोविडनंतरच्या पर्यटन व्यवसायाविषयी बोलता
गोवा ट्रँव्हल अँड टुरिझम असोसिएशन गोवाचे अध्यक्ष नीलेश शहा म्हणाले,
गोव्यात नोंदणीकृत 4100 हॉटेल्स आहेत. आतापर्यंत 1200 सुरू झाली आहेत. तर
47 हजार खोल्यापैकी 20 हजारही खोल्यांची मागणी झालेली नाही. चार्टरने
येणारे पर्यटक मोठे आकर्षण असते. साधारणत: ऑक्टोबरमध्ये पहिले चार्टर येते
त्यानंतर मार्चपर्यंत हंगाम सुरू राहतो. परंतु, कोविडमुळे तेही सुरू झालेले
नाही. त्यामुळे छोट्या हॉटेल्स सुरू झालेली नाहीत. ऑगस्टमध्ये सरकारने
हॉस्पिटॅलिटी उद्योग सुरू करण्यासाठी परवानगी दिली. तेव्हा केवळ 4 टक्के
प्रतिसाद होता. सप्टेंबरमध्ये 14-15 टक्के, ऑक्टोबळमध्ये 30-35 टक्के,
नोव्हेंबरमध्ये 50 टक्के लाभला. तर डिसेंबर हा पर्यटन हंगमातील महत्त्वाचा
काळ असतो.
यावेळी 80-85 टक्के पर्यटक असतात. आता
गोवा देशांतर्गत थेट विमानसेवेने जोडला आहे. 80 विमाने आहेत. परंतु, यामधील
50 सुरू झाली आहेत. कोविड महामारीचा परिणाम मोठा आहे. त्यामुळे हा व्यवसाय
वाचविण्यासाठी सरकारच्या मदतीची गरज आहे. सरकारच्या प्रतिसादाची अपेक्षा
आहे. सरकारही पर्यटन व्यवसाय सुरू करण्यासाठी सकारात्मक आहे. तसेच गोवा हे
उत्तम पर्यटन स्थळ असल्याने लवकर नुकसान भरून येईल, अशी आशा आहे. हा
व्यवसाय सुरू झाला असला तरी कोविड संपलेला नाही. त्यामुळे येणा-या
पर्यटकांना सर्व मार्गदर्शक तत्वांचे पालनही केले पाहिजे.