स्थैर्य, मुंबई, दि.७: ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती फार काही व्यवस्थित नसल्याची माहिती त्यांची पत्नी सायरा बानो यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दिली आहे.
दिलीप कुमार यांची प्रकृती ठीक नाही. सध्या त्यांची प्रचंड काळजी घ्यावी लागत आहे. कोरोनामुळं त्यांना विलगीकरणातच ठेवण्यात आलं असून दिलीप कुमार यांची रोगप्रतिकारशक्ती कमी झाली असल्याचं सायरा बानो यांनी सांगितलं आहे.
काही दिवसांपासून दिलीप कुमार यांची रोगप्रतिकारशक्ती कमी होतेय पण त्यांची तब्येत स्थिर आहे, असं सायराबानो यांनी सांगितलं. तसंच दिलीपजींसाठी प्रार्थना करा, असं आवाहन त्यांनी चाहत्यांना केलं आहे.