सासकल येथील प्रतिक मुळीक याची भारतीय सैन्य दलामध्ये निवड

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. १ ऑक्टोबर २०२४ | फलटण |
अतिशय जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रमाच्या बळावर प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शेतकरी कुटुंबातील सासकल गावचे रहिवासी प्रतिक बाळासाहेब मुळीक यांची भारतीय सैन्य दलामध्ये निवड झाली आहे.

प्रतिक यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सासकल येथून झाले आहे. त्यांनी आपले माध्यमिक शिक्षण श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय, गिरवी येथून पूर्ण केले आहे. इयत्ता अकरावी व इयत्ता बारावीपर्यंतचे शिक्षण त्यांनी विज्ञान शाखेतून मुधोजी महाविद्यालय फलटण येथून पूर्ण केले आहे. सध्या ते मुधोजी महाविद्यालयामध्ये कला शाखेत पदवीच्या तिसर्‍या वर्षामध्ये शिक्षण घेत आहेत.

प्रतिकने सैन्य दलातील पहिली भरती २०२२ ला दिली. तेव्हा भरतीत मैदानी चाचणीत ते अपयशी झाले. नंतर २०२३ ला दुसरी भरती निघाली. त्यात त्यांनी पहिली लेखी परीक्षा दिली व त्यात ते उत्तीर्ण झाले. नंतर त्यांनी मैदानी चाचणी दिली, पण अंतिम गुणवत्ता यादीत त्याचे नाव आले नाही. प्रतिक याने पुन्हा हार न मानता परत एकदा २०२४ मध्ये लेखी परीक्षा दिली. त्यात ते उत्तीर्ण झाले. परीक्षा पास झाल्यानंतर त्यांनी मैदानी चाचणीची तयारी मुधोजी कॉलेज, फलटण येथे चालू केली. त्याची मैदानी चाचणी गोवा या ठिकाणी झाली. तिथे मैदानी चाचणीत तो उत्तीर्ण झाले. प्रतिक याचे आई-वडील दोघेपण शेती करतात.

वयाच्या २० व्या वर्षी शेतकर्‍याचा मुलगा भारतीय सैन्यदलात भरती झाल्यामुळे प्रतिक मुळीक याचे सरपंच उषा फुले, उपसरपंच राजेंद्र घोरपडे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सासकलचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक, सासकल जन आंदोलन समितीचे पदाधिकारी, शाळा सुधार संघटनेचे सर्व पदाधिकारी, तसेच पंचक्रोशीतून अभिनंदनाचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.

आपल्या कुटुंबातील सदस्य भारतीय सैन्यात भरती झाल्यामुळे प्रतिकचे आई- वडील, आजी, काका, काकी, भाऊ, बहीण संपूर्ण कुटुंब आनंदाने भारावून गेले आहे.


Back to top button
Don`t copy text!