
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

स्थैर्य, कातरखटाव, दि. २८ : तडवळे (ता. खटाव) येथील युवा उद्योजक प्रतिक वसंतराव खाडे यांची वंजारी सेवा संघाच्या सातारा जिल्हा युवा आघाडी अध्यक्षपदी निवड झाली आहे. तर होळीचागांव येथील आदर्श शिक्षक शहाजी खाडे यांना जिल्हा सरचिटणीस पदावर संधी देण्यात आली आहे.
प्रतिक हे तडवळे येथील पी. के. इंडस्ट्रीजचे संचालक तर ओगलेवाडी येथील साई इंजिनिअरिंग इंडस्ट्रीजचे मालक उद्योगपती वसंतराव खाडे यांचे सुपुत्र आहेत. तर शहाजी खाडे हे शेनवडी येथे पदवीधर शिक्षक असून खटाव तालुका शिक्षक संघाच्या कार्याध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत. संस्थापक राहुल जाधव, प्रदेशाध्यक्ष विठ्ठलराव गीते, महासचीव बाजी दराडे, कार्याध्यक्ष देवेंद्र बारगजे आदिंच्या उपस्थितीत या निवडी करण्यात आल्या. या निवडीबद्दल प्रतिक खाडे, शहाजी खाडे यांचे खटाव-माणसह जिल्ह्यातील मान्यवरांनी अभिनंदन केले.
