प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्याचे आयोजन; फलटणमध्ये मान्यवरांची मांदियाळी

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त मंगळवारी फलटणमध्ये विशेष सत्कार सोहळ्याचे आयोजन. अनेक दिग्गजांची उपस्थिती.

स्थैर्य, फलटण, दि. ०३ ऑक्टोबर : प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त मंगळवारी (दि. ६ ऑक्टोबर) सुरवडी येथील रॉयल पॅलेस मंगल कार्यालयात विशेष सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. जनसेवेला समर्पित असणाऱ्या त्यांच्या कार्याचा या निमित्ताने गौरव करण्यात येणार आहे.

राजकीय आणि सामाजिक दिग्गजांची उपस्थिती

या सोहळ्यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. आमदार महेश शिंदे, आमदार मनोजदादा घोरपडे, आमदार सचिन पाटील, आमदार डॉ. अतुलबाबा भोसले, तसेच माजी आमदार मदन भोसले व आनंदराव नाना पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

जनमानसातील आदराचे स्थान

प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांनी आपल्या आयुष्यात पदापेक्षा माणसांना जपले आणि गरिबांच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्याचे काम केले. त्यांची संघर्षमय वाटचाल आणि जनसेवेची तळमळ यामुळे त्यांनी सर्वसामान्यांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण केले आहे. या कृतज्ञतापूर्वक गौरव सोहळ्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!