
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
स्थैर्य, आसू दि. १३ : गोखळी, ता. फलटण येथील प्रगतशील शेतकरी, श्रीराम पतसंस्थेचे संचालक प्रल्हादराव माणिकराव खटके यांचे वयाच्या ७० व्या वर्षी पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना मंगळवारी निधन झाले. रात्री उशीरा त्यांच्या पार्थिवावर गोखळी येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
राजकीय, सामाजिक, सहकार, कृषी क्षेत्रातील मान्यवरांसह आप्तेष्ट, मित्रमंडळी आणि गोखळीसह परिसरातील ग्रामस्थांनी अंत्यदर्शन घेऊन खटके कुटुंबियांचे सांत्वन केले.
