
जागतिक अपंग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित प्रहार दिव्यांग अधिकारी – कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते.
स्थैर्य, फलटण दि.५ : प्रहार दिव्यांग अधिकारी – कर्मचारी संघटनेच्यावतीने दि.3 रोजी जाधववाडी, ता.फलटण येथील बिरोबा मंदिरात जागतिक अपंग दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे फलटण तालुकाध्यक्ष विकास बोंद्रे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रहार अपंग क्रांती संघटनेचे सचिव अशोकराव गोतपागर, उपाध्यक्ष बापुराव खरात, तालुका संपर्क प्रमुख सुभाषराव मुळीक आणि कार्यालय प्रमुख महेश जगताप यांची उपस्थिती होती.
यावेळी उपस्थितांच्या समस्या जाणून घेऊन सुभाषराव मुळीक व महेश जगताप, जिल्हा सचिव दत्ता जानकर, तालुकाध्यक्ष विकास बोंद्रे यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास फलटण कार्यकारिणी सचिव सौ.विजया गावडे, जिल्हा सहकोषाध्यक्ष विकास भगत, कार्याध्यक्ष सचिन शिंदे, उपाध्यक्ष सौ.मालन कुंभार, अनिल जोशी, नेताजी खरात, सौ.सुवर्णा विभुते यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश पोमणे यांनी केले तर आभार विकास बोंद्रे यांनी मानले.