फलटण शहरात पोस्ट कोवीड सेंटर उभारावे : अशोक जाधव 


 

स्थैर्य, फलटण दि.५ : कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या लोकांना कोरोनातून बरे झाल्यानंतर वेगवेगळे त्रास उद्भवत आहेत. त्यामुळे यावरील उपचारांसाठी फलटण शहरात पोस्ट कोवीड सेंटर उभारावे, अशी मागणी फलटण नगरपरिषदेचे गटनेते, नगरसेवक अशोक जाधव यांनी मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

सदर निवेदनात, फलटण शहर व तालुक्यात गेल्या आठ महिन्यांत बहुतांश लोकांना कोरोनांची बाधा झाली आहे. यामध्ये अनेकांचे बळी देखील गेले आहेत. पोस्ट कोवीडच्या त्रासामुळे नुकतेच पंढरपूरचे आमदार भारत भालके यांचेही निधन झाले आहे. कोवीड झाल्यानंतर अनेकांना मधुमेहाचा त्रास होत आहे, तसेच रक्त पातळ होण्याच्या गोळ्या घ्याव्या लागत आहेत. काहींना श्‍वासोच्छवास, फुफ्फुसाचा त्रास जाणवत आहे. त्यामुळे यावरील उपचारासाठी शहरात फलटण शहरात तातडीने कोवीड पोस्ट सेंटरची उभारणी करण्यात यावी, असे अशोक जाधव यांनी नमूद केले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!