घाडगेवाडीच्या उपसरपंचपदी सौ. पूनम भोसले

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. 13 डिसेंबर 2023 | फलटण | तालुक्यातील घाडगेवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ. पूनम अतुल भोसले यांची उपसरपंच पदी निवड झाली आहे. नवनिर्वाचित उपसरपंच यांचा सत्कार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. घाडगेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच पद रिक्त आहे. आगामी काळामध्ये गावचा विकास करण्यासाठी विधानपरिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात कार्यरत राहणार आहे; असे उपसरपंच सौ. भोसले यांनी मत व्यक्त केले.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य धैर्यशील अनपट यांची प्रमुख उपस्थिती होती. ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच दादासाहेब बोबडे यांनी निवडणुकीत ठरल्याप्रमाणे अडीच वर्षे पूर्ण झाल्यानंतर राजीनामा दिला होता. त्यानंतर सौ. पूनम भोसले यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी सदस्य सौ. शिल्पा पोपट बोबडे, श्रीमती उज्वला शरद भोसले, पोपट दगड बोबडे, संपत राजाराम भोसले, मारुती नाना भोसले, सुरेश सूर्यकांत सापते, दशरथ बोबडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!